प्रभूचे आगमन व जागृतीची आवश्यकता
1 बंधूनो, काळ व समय ह्यांविषयी तुम्हास काही लिहिण्याची गरज नाही. 2 कारण तुम्हा स्वतःला पक्के माहीत आहे की जसा रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा दिवस येतो. 3 "शांती आहे, सुरक्षितता आहे" असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अचानक वेदना सुरु होतात त्याप्रमाणे त्यांचा अचानक नाश होईल आणि ते निभावणारच नाहीत.