17 कारण हे जे हलके दुःख केवळ तात्कालिक आहे ते आमच्यासाठी फार अधिक मोठ्या अशा सार्वकालिक गौरवाचा भार तयार करते. 18 आता आम्ही दिसणार्या गोष्टींकडे पाहत नाही पण न दिसणार्या गोष्टींकडे पाहतो कारण दिसणार्या गोष्टी क्षणिक आहेत पण न दिसणार्या गोष्टी सार्वकालिक आहेत.