योशीया व नियमशास्त्राचा ग्रंथ
1 योशीया राज्य करु लागला तेव्हा आठ वर्षांचा होता. त्याने यरूशलेमामध्ये एकतीस वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव यदीदा. ती बसकाथमधील अदाया याची मुलगी. 2 योशीयाचे वर्तन परमेश्वराच्या दृष्टीने नीट ते तो करीत असे. आपला पूर्वज दावीद याच्याप्रमाणे तो चालला. परमेश्वराच्या शिकवणुकी प्रमाणेच वागला. देवाला जसे पाहिजे तेच त्याने केले.