6 त्या वेळेस राजा योराम शोमरोन मधून बाहेर पडला आणि त्याने सर्व इस्राएल लोकांस एकत्र केले.
7 यहूदाचा राजा यहोशाफाट याच्याकडे त्याने असा निरोप पाठवला की, "मवाबाच्या राजाने माझ्याविरुध्द बंड केले आहे. तू माझ्याबरोबर मवाबाविरूद्ध लढाईला येशील काय?" यहोशाफाटाने सांगितले, "होय, मी जरुर येईन, जसा तू तसा मी, जसे तुझे लोक तसे माझे लोक, जसे तुझे घोडे तसे माझे घोडे."