5 शत्रूंना माझा जीव घ्यायचा होता.
मृत्यूच्या लाटा माझ्याभोवती थैमान घालत होत्या.
मृत्युसदनाला नेणाऱ्या पुराच्या लोंढ्यात मी सापडलो होतो.
6 अधोलोकाचे मृत्युलोकाचे पाश माझ्या भोवती आवळले होते.
मृत्यूचा सापळा माझ्यासमोर तयार होता.
7 तेव्हा मी परमेश्वराचा धावा केला. होय,
मी त्यालाच शरण गेलो देव त्याच्या मंदिरात होता त्याने माझा धावा ऐकला.
मदतीसाठी केलेला माझा आक्रोश त्याने ऐकला.