14 मग आमोस अमस्याला म्हणाला, "मी संदेष्टा नव्हतो व संदेष्ट्याचा मुलगाही नव्हतो. मी गुरांचे कळप राखणारा आणि उंबरांच्या झाडांची निगा राखणारा होतो. 15 मी कळपामागे चालण्यातून परमेश्वराने मला बोलावून घेतले, आणि मला म्हटले, ‘जा, माझ्या लोकांस, इस्राएलाला, भविष्य सांग.’
Publicidade