10 मी प्रभूच्या दिवशी आत्म्यात होतो. माझ्यामागे मी कर्ण्याच्या आवाजासारखी मोठी वाणी ऐकली. 11 ती म्हणाली, "तू जो या सर्व गोष्टी पाहतोस त्या तू एका पुस्तकात लिही आणि इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया आणि लावदीकिया या सात शहरातील मंडळ्यांना पाठव."
Publicidade