देवाच्या कोकऱ्याचा साक्षात्कार
1 मग मी, जो राजासनावर बसला होता त्याच्या उजव्या हातात मी एक गुंडाळी पाहिली. गुंडाळीवर दोन्ही बाजूंनी लिहिले होते आणि ती गुंडाळी सात शिक्के मारून बंद केली होती. 2 आणि मी एक सामर्थ्यशाली देवदूत पाहिला. तो देवदूत मोठ्या आवाजात म्हणाला, "गुंडाळीचे शिक्के तोडून ती उघडण्यास कोण योग्य आहे?"