एकशे चव्वेचाळीस हजारांवर शिक्का
1 आणि त्यानंतर मी चार देवदूत पृथ्वीच्या चार कोनावर उभे राहीलेले पाहीले, त्यांनी पृथ्वीतील चार वाऱ्यास असे घट्ट धरून ठेवले होते की पृथ्वीवर व समुद्रावर आणि कोणत्याही झाडावर वारा वाहू नये. 2 मी दुसरा एक देवदूत पूर्वेकडून वर चढताना पाहिला, त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता; ज्या चार देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला नुकसान करण्याचे सोपवून दिले होते त्यांना तो मोठ्याने ओरडून म्हणाला, 3 "आमच्या देवाचे दास यांच्या कपाळावर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला व समुद्राला आणि झाडासही नुकसान करू नका."
4 ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली; इस्राएल लोकांच्या सर्व वंशातील एकशे चव्वेचाळीस हजांरावर शिक्का मारण्यात आला.
5 यहूदा वंशातील बारा हजारांवर शिक्का मारण्यात आला
रऊबेन वंशापैकी बारा हजारांवर;
गाद वंशापैकी बारा हजारांवर;
6 आशेर वंशापैकी बारा हजारांवर;
नफताली वंशापैकी बारा हजारांवर;
मनश्शे वंशापैकी बारा हजारांवर;
7 शिमोन वंशापैकी बारा हजारांवर;
लेवी वंशापैकी बारा हजारांवर;
इस्साखार वंशापैकी बारा हजारांवर;
8 जबुलून वंशापैकी बारा हजारांवर;
योसेफ वंशापैकी बारा हजारांवर;
बन्यामीन वंशापैकी बारा हजारांवर; शिक्का मारण्यात आला.