Pular para o conteúdo
Publicidade

प्रेषितांची कृत्ये 16:29-34

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

29 मग दिवे आणवून तो आत धावत गेला, कांपत कांपत पौल व सीला ह्यांच्या पाया पडला. 30 आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला "साहेब, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहीजे?" 31 ते म्हणाले, "प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल." 32 त्यांनी त्यास व त्याच्या घरांतील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. 33 मग रात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्यांना जवळ घेऊन त्यांच्या जखमा धुतल्या; आणि तेव्हांच त्याने व त्याच्या घरच्या सर्व मनुष्यांनी बाप्तिस्मा घेतला. 34 मग त्याने त्यास घरी नेऊन जेवू घातले आणि देवावर विश्वास ठेवून त्याने व त्याच्या घरच्या मंडळीने आनंदोत्सव केला.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    29 तुरुंगाच्या नायकाने दिवे मागविले व तो धावत आला आणि पौल आणि सीला यांच्यापुढे थरथर कापत पालथा पडला. 30 त्याने त्यांना बाहेर आणले आणि विचारले, "महाराज, माझे तारण व्हावे, म्हणून मी काय करावे?"

    31 त्यांनी सांगितले, "प्रभू येशूंवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल." 32 तेव्हा त्यांनी त्याला व त्याच्या घराण्यातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. 33 मग रात्रीच्या त्याच घटकेस तुरुंगाच्या नायकाने त्यांच्या जखमा धुतल्या आणि लगेच त्याने व त्याच्या सर्व कुटुंबाने बाप्तिस्मा घेतला. 34 त्या नायकाने त्यांना आपल्या घरी आणले व त्यांच्यापुढे भोजन वाढले; तो व त्याच्या कुटुंबातील सर्व लोक परमेश्वरावरील विश्वासात आल्यामुळे अत्यंत आनंदित झाले होते.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.