Pular para o conteúdo
Publicidade

प्रेषितांची कृत्ये 19:13-16

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

13 काही यहूदी सुद्धा सगळीकडे प्रवास करीत असत व लोकांमधून दुष्ट आत्मे घालवीत असत, ते दुष्ट आत्म्याने पछाडलेल्या व्यक्तीमधून प्रभू येशूच्या नावाने ते आत्मे घालवीत असत. 14 ते म्हणत, "पौल ज्या येशूच्या नावाने घोषणा करतो त्या नावाने मी तुला आज्ञा करतो," स्किवा नावाच्या यहूदी मुख्य याजकाचे सात पुत्र असे करीत होते. 15 परंतु एकदा एक दुष्ट आत्मा त्यांना म्हणाला, "मी येशूला ओळखतो, पौल मला माहीत आहे, पण तुम्ही कोण आहात?" 16 मग ज्याला दुष्ट आत्मा लागला होता त्या मनुष्याने त्यांच्यावर उडी मारली, त्याने त्यांच्यावर सरशी केली व त्यांना पराभूत केले, तेव्हा ते दोघे उघडे व जखमी होऊन घरातून पळाले.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    13 काही यहूदी प्रभू येशूंचे नाव घेऊन फिरत होते आणि ज्यांना दुरात्म्यांनी पछाडलेले होते त्यांना मुक्त करण्याचा प्रयत्न करीत होते. ते असे म्हणत होते, "ज्या येशूंच्या नावाची पौल घोषणा करीत आहे, त्या नावाने मी तुला आज्ञा करतो की याच्यामधून बाहेर नीघ." 14 स्कवा, हा यहूदी मुख्य याजक असून त्याचे सात पुत्र हे काम करीत होते. 15 एके दिवशी त्या दुरात्म्याने त्यांना म्हटले, "येशू मला माहीत आहे आणि पौलही मला माहीत आहे, परंतु तुम्ही कोण आहात?" 16 मग ज्या मनुष्यास दुरात्मा लागला होता त्याने त्यांच्यावर उडी मारली आणि त्याच्या शक्तीने त्या सर्वांना शरण आणले. त्यांना अशी मारपीट केली की ते उघडेनागडे व घायाळ होऊन त्या घरातून पळून गेले.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.