पेन्टेकॉस्टच्या वेळेचे पेत्राचा उपदेश
14 तेव्हा पेत्र अकरा प्रेषितांबरोबर उभा राहून, त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहूदी लोकांनो व यरूशलेम शहरातील रहिवाश्यांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या. 15 तुम्हास वाटते हे मस्त झाले आहेत, पण असे नाही कारण सकाळचे नऊ वाजले आहेत. 16 परंतु योएल संदेष्ट्याने जे सांगितले होते ते हे आहे:
17 देव म्हणतो, "शेवटच्या दिवसात असे होईल,
मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन,
तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील.
तुमच्या तरूणांस दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील.