ख्रिस्ती लोकांचा छळ आणि त्यांची पांगापांग
1 स्तेफनाचा जो खून झाला त्यास शौलाची संमती होती. त्या दिवसापासून यरूशलेम शहर; येथील ख्रिस्ताच्या मंडळीचा मोठा छळ सुरू झाला, प्रेषितांशिवाय इतर सर्व विश्वास ठेवणारे शिष्य यहूदीया व शोमरोन प्रांताच्या, कानाकोपऱ्यात पांगून गेले.