30 मग फिलिप्प त्या रथाजवळ धावत धावत गेला, तेव्हा त्याने त्यास यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचताना ऐकले, फिलिप्प त्यास म्हणाला, "तुम्ही जे वाचत आहात ते तुम्हास समजते काय?" 31 तो अधिकारी म्हणाला, "मला हे कसे, समजेल कोणीतरी याचा उलगडा करून मला सांगायला हवे?" आणि त्याने फिलिप्पाला रथात चढून आपल्यापाशी बसण्यास बोलावले.
32 शास्त्रलेखातील जो भाग तो वाचत होता तो भाग पुढीलप्रमाणे होता, "वधावयला घेऊन जात असलेल्या मेंढरासारखा तो होता; लोकर कातरणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या कोकरांप्रमाणे तो शांत राहिला, त्याने आपले तोंड उघडले नाही: