5 फिलिप्प शोमरोन प्रांतातील एका शहरात गेला, त्याने ख्रिस्ताची घोषणा केली तेथील लोकांनी फिलिप्पाचे बोलणे ऐकले, व त्याने केलेले चमत्कार पाहिले. 6 फिलिप्प जी चिन्हे करत असे व ज्या गोष्टी त्यांना सांगत असे, ते ती लक्षपूर्वक ऐकत असत. 7 कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळांतून ते मोठ्याने ओरडून निघून गेले; तेथे बरेच लंगडे व अर्धांगवायू झालेले लोक बरे झाले. 8 यामुळे शहरातील लोक फार आनंदित झाले.
Publicidade