21 आणि तुम्ही जे एकेकाळी देवाशी परके होता आणि तुमच्या दुष्ट वासनांमुळे, मनाने वैरी झाला होता, 22 त्या तुमचा, त्याने त्याच्या दैहिक शरीरात त्याच्या मरणाद्वारे, आता, स्वतःशी समेट केला आहे. म्हणजे त्याने तुम्हास त्याच्या दृष्टीपुढे पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे सादर करावे. 23 कारण, तुम्ही विश्वासात पाया घातलेले व स्थिर असे राहिला आहात आणि तुम्ही ऐकलेल्या व आकाशाखालच्या सर्व सृष्टीला गाजविण्यांत आलेल्या सुवार्तेच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही; आणि मी पौल तिचा सेवक झालो आहे.
Publicidade