6 तू आपल्या हृदयावर शिक्क्याप्रमाणे,
आपल्या बाहूवर शिक्क्यासारखी मला ठेव.
कारण प्रेम मृत्यूसारखेच शक्तीशाली आहे. प्रेमसंशय मृतलोकासारखा कठोर आहे.
त्याची ज्वाला, अग्नीज्वालेसारखी,
किंबहुना प्रदीप्त केलेला तो अग्नीच आहे.
7 असले प्रेम महाजलांच्यानेही विझवणार नाही.
महापुरांनी तिला बुडवून टाकिता येणार नाही.
जरी मनुष्याने प्रेमासाठी आपल्या घरची सगळी संपत्ती दिली तरी,
ती तोत्यापुढे अगदी तुच्छ होय.