17 मग या चार तरुणास देवाने ज्ञान आणि सर्व प्रकारच्या शास्त्रांचा समज आणि शहाणपण दिले, आणि दानीएलास सर्व प्रकारचे स्वप्न व दृष्टांत उलगडत असत. 18 राजाने ठरवून दिलेल्या काळाच्या समाप्तीनंतर प्रमुख अधिकारी त्यांना नबुखद्नेस्सर राजासमोर घेऊन आला.
19 राजा त्यांच्याशी बोलला, त्या सर्व समुदायामध्ये दानीएल हनन्या, मीशाएल, व अजऱ्या यांच्या तोडीचा दुसरा कोणीच नव्हता. ते राजासमोर त्याच्या सेवेस राहू लागले.