23 माझ्या पूर्वजाच्या देवा, मी तुझे आभार मानतो आणि तुझे स्तवन करतो,
कारण तू मला ज्ञान आणि सामर्थ्य दिले;
आणि जे आम्ही तुझ्याजवळ मागितले ते सर्व तू आता मला कळवले आहे म्हणून मी तुझे उपकार मानतो व तुझी स्तुती करतो,
कारण तू राजाची गोष्ट आम्हास कळविली आहे.