Pular para o conteúdo
Publicidade

दानिएल 4:30-37

30 "काय ही महान बाबेल नगरी, जी मी माझ्या राज निवासासाठी आणि माझ्या गौरवासाठी बांधली." 31 जेव्हा राजा हे बोलत होता. पाहा स्वर्गातून वाणी झाली, "राजा नबुखद्नेस्सरा, हे फर्मान ऐक, तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे. 32 तुला लोकातून काढून टाकण्यात येईल तुझी वस्ती वनपशूत होईल तुला बैलांसारखे गवत खावे लागेल आणि मानवी राज्यावर देवाची सत्ता आहे, तो ते पाहिजे त्यांना देतो, हे तुला ज्ञान होईपर्यंत सात वर्षे जातील."

33 हे फर्मान त्याच घटकेस नबुखद्नेस्सराचा विरोधात अमलात आले. त्यास मानसातून काढण्यात आले, त्याने बैलांसारखे गवत खाल्ले. त्याचे शरीर आकाशातल्या दवांनी भिजले त्याचे केस गरुडाच्या पिसाप्रमाणे वाढले आणि त्याची नखे पक्षाच्या नखांसारखी झाली.

34 या दिवसाच्या शेवटी मी नबुखद्नेस्सराने माझे डोळे आकाशाकडे लावले, माझी बुद्धीमत्ता मला परत मिळाली,

मी सर्वोच्च देवाचे आभार मानले,

जो सदाजिवी देव त्याचा मी सन्मान केला आणि त्याची थोरवी गाईली,

कारण त्याचे प्रभूत्व कायमचे आणि त्याचे राज्य पिढ्यानपिढ्या राहणारे आहे.

35 भूतलावरील सर्व रहीवासी त्यास शुन्यवत आहेत.

तो स्वर्गातील आपल्या सैन्याचे, भूतलावरील रहीवाश्यांचे पाहिजे ते करतो,

कोणीही त्यास थांबवू शकत नाही

किंवा विचारू शकत नाही की "तू हे का केले?"

36 त्याच समयी माझी बुध्दीमत्ता परत मिळाली माझे राजवैभव आणि प्रताप मला परत प्राप्त झाले मी माझ्या सिंहासनावर पुन्हा बसलो आणि मला मोठी थोरवी प्राप्त झाली. 37 आता मी, नबुखद्नेस्सर, स्वर्गीय राजास गौरव देवून त्याची खूप स्तुती करतो, कारण त्याची सर्व कामे सभ्यतेची आणि त्याचे मार्ग न्यायाचे आहेत. जे गर्वाने चालतात त्यास तो नम्र करतो.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.