Pular para o conteúdo
Publicidade

दानिएल 6:1-3

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

सिंहाच्या गुहेत दानीएल

1 दारयावेश राजाने त्याच्या मर्जिने आपल्या सर्व साम्राज्यात एकशे वीस प्रांताधिकारी नेमले. 2 त्यांच्यावर तीन मुख्यप्रशासक होते. त्यापैकी एक दानीएल होता. या प्रशासकांची नेमणूक यासाठी होती की राजाचे काही नुकसान होऊ नये म्हणून सर्व प्रांताधिकाऱ्यांनी त्यांना हिशोब द्यावा व त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. 3 दानीएल त्या प्रशासक व प्रांताधिकाऱ्यांत श्रेष्ठ ठरला कारण त्याच्यामध्ये उत्तम आत्मा वसत होता. राजा त्यास सर्व राज्यावर नेमण्यासाठी योजना करत होता.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    1 दारयावेश राजाने आपल्या मर्जीनुसार आपल्या संपूर्ण साम्राज्यात राज्य करण्यासाठी 120 प्रांताधिकारी नियुक्त करावे, 2 व त्यांच्यावर तीन अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली होती, ज्यामध्ये दानीएल एक होता. राजाला कोणत्याच प्रकारची हानी होऊ नये म्हणून प्रांताधिकार्‍यांनी त्यांना हिशोब द्यावा. 3 दानीएल हा अध्यक्ष व प्रांताधिकारी यांच्यापेक्षा त्याच्या विलक्षण गुणांमुळे सरस असल्यामुळे शासक म्हणून त्यालाच संपूर्ण साम्राज्यावर नेमावे अशी राजाची योजना होती.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.