10 या फर्मानावर सही झाली हे दानीएलास जेव्हा माहित झाले, तेव्हा तो आपल्या घरी गेला, त्याच्या खोलीच्या खिडक्या यरूशलेमेच्या दिशेने उघडत होत्या, तेथे तो गुडघ्यावर आला आणि त्याने प्रार्थना करून देवास धन्यवाद दिला. हे तो दररोज दिवसातून तिनवेळा करत असे.
16 नंतर राजदेशानुसार दानीएलास आणून सिंहाच्या गुहेत टाकले राजा दानीएलास म्हणाला, "ज्या देवाची तू सेवा करतोस तो तुला सोडवो."
22 माझ्या देवाने त्याचा दिव्यदूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली त्यांनी मला इजा केली नाही. त्याच्यासमोर आणि आपल्यासमोर मी निर्दोष ठरलो व महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही."
23 नंतर राजाने आनंदी होऊन आज्ञा केली की, "दानीएलास गुहेतून बाहेर काढा" मग दानीएलास बाहेर काढले त्याच्या शरीरावर इजा नव्हती कारण त्याने आपल्या देवावर विश्वास ठेवला.
27 तो आम्हास सुरक्षीत करतो,
आणि आम्हास सोडवतो.
तो स्वर्ग आणि पृथ्वीवर चिन्ह;
आणि चमत्कार करतो त्याने दानीएलास सिंहाच्या पंजातून सोडवले.