16 या न्यायाधीशांना मी त्यावेळी सांगितले की तुमच्या भाऊबंदांतील वाद नीट ऐकून घ्या. निवाडा करताना पक्षपात करू नका मग तो वाद दोन भावांमधला असो की एखादा मनुष्य व त्याचा भाऊबंद व उपरी यांच्यातील असो. नीतिने न्याय करा. 17 न्याय करताना कोणालाही कमी लेखू नका. लहान मोठ्यांचे सारखे ऐकून घ्या. कोणाचे तोंड पाहून घाबरू नका; कारण न्याय करणे देवाचे काम आहे. एखादे प्रकरण तुम्हास विशेष अवघड वाटले तर ते माझ्याकडे आणा. मी त्याचा निवाडा करीन.
Publicidade