मयतासाठी दुःखप्रदर्शन करण्याच्या प्रथेला मनाई
1 तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची मुले आहात. तेव्हा कोणी मरण पावले तर अंगावर वार करून घेणे, मुंडण करणे असे करु नका. 2 कारण इतरांपेक्षा तुम्ही वेगळे आहात. तुमचा देव परमेश्वर याची पवित्र प्रजा आहात. आपली खास प्रजा म्हणून त्याने भुतलावरील सर्व राष्ट्रातून तुमची निवड केली आहे.