20 पण हा संदेष्टा मी न सांगितलेले ही काही माझ्या वतीने बोलला, तर त्यास मृत्युदंड दिला पाहिजे. इतर दैवतांच्या वतीने बोलणारा संदेष्टाही कदाचित उदयास येईल. त्यालाही ठार मारले पाहिजे. 21 तुम्ही म्हणाल की अमुक वचन परमेश्वराचे नव्हे हे आम्हास कसे कळणार? 22 तर, परमेश्वराच्या वतीने म्हणून तो संदेष्टा काही बोलला व ते प्रत्यक्षात घडले नाहीतर समजा की ते परमेश्वराचे बोलणे नव्हते, तर तो संदेष्टा स्वत:चेच विचार बोलून दाखवत होता. त्यास तुम्ही घाबरायचे कारण नाही.
Publicidade