16 त्यांनी अन्य दैवतांची पूजा करायला सुरुवात केली आणि त्याची ईर्ष्या जागवली. मूर्ती त्यास मान्य नाहीत, तरी या लोकांनी मूर्ती केल्या व त्याचा कोप ओढवला. 17 खरे देव नव्हेत अशा भुतांना त्यांनी यज्ञार्पणे केली. अपरिचित दैवतांची पूजा केली. आपल्या पूर्वजांना पूर्वी कधी माहीत नसलेल्या दैवतांची पूजा केली. 18 आपल्या निर्माणकर्त्याच्या दुर्गाचा त्यांनी त्याग केला. जीवनदायी देवाला ते विसरले.
Publicidade