Pular para o conteúdo
Publicidade

निर्गम 18:21,22

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

21 तू लोकांमधून कर्तबगार देवाचे भय धरणारे, व विश्वासू, सत्यप्रिय, अन्याय न करणारे असे लोक निवडून घे; त्यांना हजार लोकांवर, शंभर लोकांवर, पन्नास लोकावर आणि दहा लोकांवर नायक म्हणून नेम. 22 या नायक लोकांनी लोकांचा न्यायनिवाडा करावा; जर अगदी महत्वाची बाब असेल तर तिचा न्यायनिवाडा करण्याकरता तो वाद नायकांनी तुझ्याकडे आणावा, परंतु लहानसहान प्रकरणांसंबंधी त्यांनी स्वत: निर्णय द्यावेत. अशा प्रकारे तुझे काम सोपे होईल तसेच तुझ्या कामात ते वाटेकरी होतील.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    21 पण या सर्व लोकांमधून सक्षम असे लोक—जे परमेश्वराचे भय बाळगणारे, विश्वसनीय, व अन्यायाच्या लाभाचा द्वेष करणारे असतील—ते निवडून घे; त्यांची हजारांवर, शंभरांवर, पन्नासांवर आणि दहांवर अधिकारी म्हणून नेमणूक कर. 22 त्यांनी सर्व समयी लोकांचे न्यायाधीश म्हणून असावे, परंतु प्रत्येक अवघड वाद तुझ्याकडे आणावा; आणि सोपे वाद त्यांच्या अधिकार्‍यांनी सोडवावेत. त्यामुळे तुझे ओझे हलके होईल, कारण ते तुझ्याबरोबर तुझा भार वाहतील.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.