12 आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख म्हणजे त्यामुळे परमेश्वर तुझा देव जो देश तुला देत आहे त्या देशात तू चिरकाळ राहशील. 13 खून करू नकोस. 14 व्यभिचार करू नकोस. 15 चोरी करू नकोस. 16 आपल्या शेजाऱ्याविरूद्ध खोटी साक्ष देऊ नकोस. 17 "तू आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नकोस; आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीचा लोभ धरू नकोस; आपल्या शेजाऱ्याचा दासदासी, बैल, गाढव, किंवा त्याच्या कोणत्याही वस्तूचा लोभ धरु नकोस."
Publicidade
निर्गम 20:12-17
IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi
Em outras traduções
- OMRCV Marathi Contemporary Version
12 आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान करा, म्हणजे जो देश याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत आहे, त्यात तुम्ही दीर्घकाळ राहाल.
13 तुम्ही खून करू नका.
14 तुम्ही व्यभिचार करू नका.
15 तुम्ही चोरी करू नका.
16 तुमच्या शेजार्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नका.
17 तुमच्या शेजार्याच्या घराचा लोभ धरू नका. तुमच्या शेजार्याच्या पत्नीची अभिलाषा धरू नका किंवा त्याच्या दासाचा किंवा दासीचा, किंवा त्याच्या बैलाचा किंवा त्याच्या गाढवाचा, किंवा त्याच्या मालकीचे जे काही असेल त्या कशाचाही लोभ धरू नका.
Direitos das traduções citadas
Estes versículos te tocaram? Ore agora!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.