8 शब्बाथ दिवस हा पवित्र दिवस म्हणून पाळण्याची आठवण ठेव; 9 सहा दिवस श्रम करून तू तुझे कामकाज करावेस; 10 परंतु सातवा दिवस तुझा देव परमेश्वर याचा शब्बाथ आहे, म्हणून त्या दिवशी तू, तुझा पुत्र, तुझी कन्या, तुझे दास व दासी यांनी तसेच तुझे पशू, किंवा तुझ्या वेशीत राहणाऱ्या परकीयांनीही कोणतेही कामकाज करु नये;