ख्रिस्ती नागरिकत्व स्वर्गीय आहे
20 आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे; त्याची आपण वाट पाहत आहोत. 21 ज्या सामर्थ्याने तो सर्वकाही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्या सामर्थ्यांने तो तुमचे आमचे नीच स्थितीचे शरीर आपल्या गौरवीच्या शरीरासारखे व्हावे म्हणून त्यांचे रूपांतर करील.