Pular para o conteúdo
Publicidade

फिलिप्पैकरांस पत्र 4:6-9

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

6 कशा ही विषयाची काळजी करू नका पण प्रार्थना आणि विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; 7 म्हणजे सर्व बुद्धीसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.

8 बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही खरे आहे, जे काही आदरणीय आहे, जे काही न्याय्य आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यावर विचार करा. 9 माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले व माझे जे ऐकले व पाहिले ते तुम्ही आचरीत राहा आणि शांतीदाता देव तुमच्याबरोबर राहील.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    6 कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व परिस्थितीत, प्रार्थना व विनवणी करीत, उपकारस्तुतीसह आपल्या मागण्या परमेश्वराला कळवा. 7 आणि परमेश्वराची शांती, जी आपल्या सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे, ती तुमचे विचार आणि तुमची मने ख्रिस्त येशूंमध्ये राखील.

    8 शेवटी, बंधू आणि भगिनींनो, जे काही सत्य, जे काही आदरणीय व जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही सुंदर, जे काही प्रशंसनीय, श्रवणीय आणि स्तुतिपात्र आहे त्याचा विचार करा. 9 माझ्यापासून तुम्ही जे सर्वकाही शिकला किंवा स्वीकारले किंवा ऐकले, किंवा मजमध्ये पाहिले त्यानुसार आचरण करा आणि शांती देणारे परमेश्वर तुम्हाबरोबर राहतील.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.

Filipenses
Ver todos os capítulos de Filipenses