विश्वासाचा परिणाम
26 पण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्याद्वारे देवाचे पुत्र आहात. 27 कारण ख्रिस्तात तुम्हामधील जितक्यांचा बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. 28 यहूदी किंवा ग्रीक, दास किंवा स्वतंत्र नाही, पुरूष किंवा स्त्री हा भेदच नाही कारण ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही सर्वजण एकच आहात.