Pular para o conteúdo
Publicidade

पौलाचे गलतीकरांस पत्र 5:1-6

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

1 या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मोकळे केले आहे म्हणून त्यामध्ये तुम्ही टिकून राहा आणि दासपणाच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका.

शुभवर्तमान व नियमशास्त्र ह्यातून कोणते निवडणार?

2 पाहा, मी पौल तुम्हास हे सांगतो की, तुम्ही जर सुंता करून घेतली तर तुम्हास ख्रिस्ताचा उपयोग नाही. 3 कारण सुंता झालेल्या प्रत्येक मनुष्यास मी हे पुन्हा निक्षून सांगतो की, तो संपूर्ण नियमशास्त्र पाळण्यास बांधलेला आहे. 4 नियमशास्त्राने नीतिमान ठरण्याची इच्छा धरता ते तुम्ही ख्रिस्ताला अंतरला आहा; तुम्ही कृपेला अंतरला आहा, 5 कारण आपण देवाच्या आत्म्याच्याद्वारे, विश्वासाने, नीतिमत्त्वाची आशा धरून वाट पाहत आहोत. 6 ख्रिस्त येशूमध्ये सुंता काही कामाची नाही आणि सुंता न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही; तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    1 ख्रिस्ताने स्वातंत्र्यासाठी आपल्याला मुक्त केले आहे, म्हणून त्यामध्ये स्थिर राहा व पुन्हा दास्यत्वाच्या जोखडाखाली सापडू नका.

    2 माझे ऐकून घ्या! मी पौल तुम्हाला सांगतो की जर तुम्ही स्वतः सुंता करून घेत असाल, तर ख्रिस्ताचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही. 3 मी पुन्हा प्रत्येक मनुष्यास जाहीर करतो की जो कोणी आपली सुंता करून घेईल, तो पूर्ण नियमशास्त्र आचरण्यास बांधलेला आहे. 4 तुम्ही नीतिमान ठरावे म्हणून नियमांचे पालन करता ते तुम्ही ख्रिस्तापासून वेगळे झाले आहात; आणि परमेश्वराच्या कृपेला अंतरले आहात. 5 आम्ही पवित्र आत्म्याद्वारे नीतिमत्व प्राप्त करावे या विश्वासाने आशा धरून वाट पाहत आहोत. 6 ख्रिस्त येशूंमध्ये सुंता होणे किंवा न होणे याला काही महत्त्व नाही; फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे विश्वास प्रीतीद्वारे प्रकट व्हावा.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.