26 देव बोलला, "आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्या सारखा मनुष्य निर्माण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, सर्व वनपशू, मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान प्राणी यांच्यावर त्यांना सत्ता चालवू देऊ."
27 देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला.
त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपाचा असा देवाने तो निर्माण केला.
नर व नारी असे त्यांना निर्माण केले.
28 देवाने त्यांना आशीर्वाद दिला, आणि त्यांना म्हटले, "फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. ती आपल्या सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर फिरणारा प्रत्येक सजीव प्राणी यांवर सत्ता चालवा."