23 मग अब्राहाम परमेश्वराजवळ जाऊन म्हणाला, "तू दुष्टाबरोबर नीतिमानांचाही नाश करशील काय? 24 कदाचित त्या नगरात पन्नास नीतिमान लोक असतील तर त्या नगराचा तू नाश करणार काय? तू त्या नगरात राहणाऱ्या पन्नास नीतिमान लोकांसाठी नगराचा बचाव करणार नाहीस काय? 25 असे करणे तुझ्यापासून दूर असो. दुष्टाबरोबर नीतिमानाला मारणे म्हणजे नीतिमानाला दुष्टासारखे वागवणे हे तुझ्यापासून दूर असो! जो तू संपूर्ण पृथ्वीचा न्यायाधीश आहेस, तो तू योग्य न्याय करणार नाहीस काय?" 26 परमेश्वर म्हणाला, "या सदोम शहरात मला पन्नास नीतिमान लोक सापडले तरीही त्यांच्यासाठी मी संपूर्ण स्थळाचा बचाव करीन." 27 अब्राहामाने उत्तर देऊन म्हटले, "पाहा मी केवळ धूळ व राख आहे, तरी प्रभूजवळ बोलायला धजतो! 28 समजा जर पाच लोक कमी असतील म्हणजे फक्त पंचेचाळीसच चांगले लोक असतील तर? त्या पाच कमी असलेल्या लोकांकरता तू सर्व नगराचा नाश करशील काय?" आणि तो म्हणाला, "मला पंचेचाळीस लोक चांगले आढळले तर मी नगराचा नाश करणार नाही." 29 पुन्हा तो परमेश्वरास म्हणाला, "आणि जर तेथे तुला चाळीसच चांगले लोक आढळले तर? संपूर्ण शहराचा तू नाश करशील काय?" परमेश्वर म्हणाला, "जर मला चाळीसच लोक चांगले आढळले तरीही, मी शहराचा नाश करणार नाही." 30 तो म्हणाला, "प्रभू, कृपा करून तुला राग न यावा म्हणजे मी बोलेन. तेथे फक्त तीसच मिळाले तर?" परमेश्वर म्हणाला, "जर तीस चांगले लोक असतील तरीही मी तसे करणार नाही." 31 तो म्हणाला, "मी प्रभूशी बोलायला धजतो! समजा तेथे कदचित वीसच मिळाले तर?" परमेश्वराने उत्तर दिले, "त्या वीसांकरताही मी नगराचा नाश करणार नाही." 32 शेवटी तो म्हणाला, "प्रभू, कृपा करून माझ्यावर रागावू नकोस, मी शेवटी एकदाच बोलतो. कदाचित तुला तेथे दहाच लोक मिळाले तर?" परमेश्वर म्हणाला, "त्या दहांकरताही मी नगराचा नाश करणार नाही." 33 मग परमेश्वराने अब्राहामाशी बोलणे संपविल्याबरोबर तो लगेच निघून गेला, आणि अब्राहाम आपल्या तंबूकडे परत आला.
Publicidade
उत्पत्ति 18
Estes versículos te tocaram? Ore agora!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.