3 रऊबेना, तू माझा पहिलाच म्हणजे थोरला मुलगा आहेस. पुरुष म्हणून माझ्यात असलेल्या शक्तीचा तू पहिला पुरावा आहेस,
तू सर्वांपेक्षा अधिक शक्तीवान व सर्वांपेक्षा अधिक अभिमान वाटावा असा आहेस.
4 परंतु तुझ्या भावना पुराच्या पाण्याच्या अनावर व चंचल लाटांप्रमाणे आहेत.
कारण तू आपल्या वडिलाच्या पलंगावर गेलास व त्याच्या बिछान्यावर जाऊन तो अशुद्ध केलास."