Pular para o conteúdo
Publicidade

इब्री लोकांस पत्र 10:3-10

3 परंतु त्याऐवजी ते यज्ञ वर्षानुवर्षे पापांची आठवण करून देतात. 4 कारण बैलांच्या किंवा बकऱ्याच्या रक्ताने पाप नाहीसे होणे अशक्य आहे.

5 म्हणून ख्रिस्त जेव्हा या जगात आला, तेव्हा तो देवाला म्हणाला,

"तुला यज्ञ व अर्पणे याची इच्छा नव्हती,

त्याऐवजी तू माझ्यासाठी शरीर तयार केले.

6 होमार्पणांनी व पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला आनंद वाटला नाही.

7 ह्यावरून मी म्हणालो, हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे."

8 वर उल्लेखल्याप्रमाणे तो म्हणाला, "यज्ञ, अन्नार्पणे, होमार्पणे व पापाबद्दलची अर्पणे, ह्यांची इच्छा तुला नव्हती व त्यामध्ये तुला संतोष नव्हता." (जरी नियमशास्त्रानुसार ही अर्पणे करण्यात येतात.) 9 मग तो म्हणाला, "हा मी आहे! तुझी इच्छा पूर्ण करण्यास मी आलो आहे." दुसरे स्थापावे म्हणून तो पहिले काढून टाकतो. 10 देवाच्या इच्छेनुसार येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देह अर्पणाद्वारे आपण पवित्र करण्यात आलो आहोत.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.