Pular para o conteúdo
Publicidade

इब्री लोकांस पत्र 10:35-39

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

35 म्हणून धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे. 36 तुम्ही धीर धरणे जरूरीचे आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करून त्याने तुम्हास दिलेल्या त्याच्या वचनाप्रमाणे तुम्हास प्रतिफळ मिळावे.

37 पवित्र शास्त्र असे म्हणते;

कारण अगदी थोडा वेळ राहीला आहे;

"जो येणारा आहे, तो येईल, तो उशीर लावणार नाही.

38 माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल;

आणि जर तो माघार घेईल, तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष होणार नाही." 39 परंतु ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यापैकी आपण नाही; तर जीवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यापैकी आहोत.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    35 तुमचा विश्वास सोडू नका, त्याचे मोठे प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे.

    36 तुम्ही परमेश्वराची इच्छा पूर्ण केल्यानंतर जे वचन त्यांनी तुम्हाला दिले आहे ते तुम्हास मिळेल यासाठी धीराचे अगत्य आहे. 37 कारण,

    "अगदी थोड्या वेळात,

    जो येणार आहे तो येईल

    आणि उशीर करणार नाही."10:37 यश 26:20

    38 आणि,

    "माझा नीतिमान विश्वासाने जगेल.

    आणि माघार घेणार्‍यामध्ये

    मला संतोष वाटणार नाही."10:38 हब 2:4

    39 माघार घेणार्‍यातील आणि नाश होणार्‍यातील आपण नाही, परंतु ज्यांच्याजवळ विश्वास असून ज्यांना तारणप्राप्ती झाली आहे त्यांच्यात आपण सामील आहोत.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.