4 कारण प्रत्येक घर बांधणारा कोणीतरी असतो, पण सर्वकाही देवाने बांधलेले आहे.
5 देवाच्या संपूर्ण घराण्यात मोशे हा सेवक म्हणून अधिक विश्वासू होता, देवाच्या गोष्टी पुढील काळात ज्या होणार होत्या, त्याविषयी त्याने लोकांस साक्ष दिली. 6 परंतु ख्रिस्त हा पुत्र म्हणून देवाच्या घराण्यात विश्वासू आहे आणि जर आम्ही आपला विश्वास व आशा यांचा अभिमान बाळगतो व धीर धरतो, तर आपणही त्याचे घर आहोत. आपण सतत देवाला अनुसरले पाहिजे.