Pular para o conteúdo
Publicidade

योहान 1:1-18

अनंतकालीक शब्द

1 प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. 2 तोच प्रारंभी देवासह होता. 3 सर्वकाही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याने केल्यावांचून झाले नाही. 4 त्याच्यामध्ये जीवन होते; आणि ते जीवन मनुष्यमात्राचा प्रकाश होते. 5 तो प्रकाश अंधारात प्रकाशतो; तरी अंधाराने त्यास स्वीकारले नाही.

6 देवाकडून पाठविलेला एक मनुष्य प्रकट झाला; त्याचे नाव योहान. 7 तो साक्षीकरीता, त्या प्रकाशाविषयी साक्ष द्यावी म्हणून आला; यासाठी की सर्वांनी त्याच्याद्वारे विश्वास ठेवावा. 8 योहान तो प्रकाश नव्हता, पण त्या प्रकाशाविषयी साक्ष द्यावी म्हणून आला.

9 जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्यास प्रकाशित करतो तो जगात येणार होता. 10 तो जगात होता व जग त्याच्याद्वारे निर्माण झाले, तरी जगाने त्यास ओळखले नाही. 11 जे त्याचे स्वतःचे त्यांच्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. 12 पण जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवला, तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. 13 त्यांचा जन्म रक्त किंवा देहाची इच्छा किंवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, तर देवापासून झाला.

14 शब्द देह झाला व त्याने आमच्यात वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहीले, ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे कृपेने व सत्याने परिपूर्ण होते. 15 योहान त्याच्याविषयी साक्ष देतो आणि मोठ्याने म्हणतो, "ज्याच्याविषयी मी सांगितले की, माझ्यामागून जो येत आहे तो माझ्यासमोर झाला आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता, तो हाच आहे." 16 त्याच्या पूर्णतेतून आपल्या सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे. 17 कारण नियमशास्त्र मोशेच्याद्वारे देण्यात आले होते; कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे झाली. 18 देवाला कोणीही कधीहि पाहिले नाही. जो देवाचा एकुलता एक पुत्र पित्याच्या उराशी असतो त्याने त्यास प्रकट केले आहे.

मत्त. 3:1-12; मार्क 1:1-8; लूक 3:1-20

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.