45 फिलिप्पाला नथनेल भेटल्यावर तो त्यास म्हणाला, "ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व तसेच संदेष्ट्यांनी लिहिले, तो म्हणजे योसेफाचा पुत्र येशू नासरेथकर आम्हास सापडला आहे." 46 नथनेल त्यास म्हणाला, "नासरेथमधून काहीतरी उत्तम निघू शकेल काय?" फिलीप्पाने त्यास म्हणाला, "येऊन पाहा."