Pular para o conteúdo
Publicidade

योहान 11:21-26

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

21 तेव्हा मार्था येशूला म्हणाली, "प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मरण पावला नसता. 22 तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल, हे मला ठाऊक आहे." 23 येशूने तिला म्हटले, "तुझा भाऊ पुन्हा उठेल." 24 मार्था त्यास म्हणाली, "तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानसमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे." 25 येशूने तिला म्हटले, "पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरण पावला असला तरी जगेल. 26 आणि जिवंत असलेला प्रत्येकजण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही, यावर तू विश्वास ठेवतेस काय?"

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    21 "प्रभूजी," मार्था येशूंना म्हणाली, "आपण येथे असता, तर माझा भाऊ मेला नसता. 22 परंतु तरी आता जे काही आपण परमेश्वराजवळ मागाल, ते आपणास ते देतील हे मला ठाऊक आहे."

    23 त्यावर येशूंनी तिला सांगितले, "तुझा भाऊ पुन्हा उठेल."

    24 मार्था म्हणाली, "होय, अंतिम दिवशी, पुनरुत्थानाच्या दिवशी तो जिवंत होईल."

    25 येशू तिला म्हणाले, "पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो कोणी मजवर विश्वास ठेवतो, तो मरण पावला असला, तरी पुन्हा जगेल; 26 जो कोणी मजवर विश्वास ठेवून जगतो तो कधीही मरणार नाही. यावर तुझा विश्वास आहे काय?"

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.