13 पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. 14 तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन.
पवित्र आत्मा मिळण्याबद्दल वचन
15 माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. 16 मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हास दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. अशासाठी की, त्याने तुम्हाबरोबर सर्वकाळ रहावे.