26 तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हास सर्वकाही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हास सांगितल्या त्या सर्वाची तुम्हास आठवण करून देईल. 27 मी तुम्हास शांती देऊन ठेवितो; मी आपली शांती तुम्हास देतो जसे जग देते तसे मी तुम्हास देत नाही; तुमचे अंतःकरण अस्वस्थ किंवा भयभीत होऊ नये,
Publicidade