15 तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करीत नाही, तर तू त्यांना दुष्टापासून राखावे अशी मी विनंती करतो. 16 जसा मी जगाचा नाही, तसे तेही जगाचे नाहीत. 17 तू त्यांना सत्यात पवित्र कर. तुझे वचन हेच सत्य आहे. 18 जसे तू मला जगात पाठवले तसे मीही त्यांना जगात पाठवले आहे.