28 मग, आता सर्व पूर्ण झाले आहे, हे जाणून येशूने, शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून, "मला तहान लागली आहे" असे म्हटले. 29 तेथे, एक आंब भरून ठेवलेले भांडे होते, म्हणून त्यांनी आंबेने भरलेला एक बोळा एका एजोब झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला. 30 येशूने आंब घेतल्यानंतर म्हटले, "पूर्ण झाले आहे." आणि आपले मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला.
Publicidade