4 म्हणून पिलाताने पुन्हा बाहेर येऊन, म्हटले, "पाहा, मला त्याच्यात काही अपराध दिसत नाही, हे तुम्हास समजावे म्हणून मी त्यास तुमच्याकडे बाहेर आणतो." 5 तेव्हा येशू काट्यांचा मुकुट व जांभळा झगा घातलेला बाहेर आला आणि पिलात त्यांना म्हणाला, "पाहा, हा मनुष्य!" 6 मुख्य याजक लोक व त्यांचे कामदार त्यास बघून ओरडून म्हणाले, याला "वधस्तंभावर खिळा, वधस्तंभावर खिळा." पिलात त्यांना म्हणाला, "तुम्हीच त्यास नेऊन, वधस्तंभावर खिळा; कारण मला त्याच्यात काही अपराध दिसत नाही."
Publicidade