19 ती स्त्री त्यास म्हणाली, "साहेब, आपण संदेष्टे आहात हे आता मला समजले. 20 आमच्या पूर्वजांनी याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता की, जिथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरूशलेम शहरात आहे." 21 येशू तिला म्हणाला, "मुली, माझ्यावर विश्वास ठेव की अशी घटका येत आहे; तुम्ही या डोंगरावर किव्हा यरूशलेम शहरात पित्याची उपासना करणार नाही, 22 तुम्ही ज्याला ओळखीत नाही अशाची उपासना करता; आम्हास ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो, कारण यहूद्यांतूनच तारण आहे. 23 तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने स्वर्गीय पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे; कारण आपले उपासक असेच असावेत, अशी पित्याची इच्छा आहे. 24 देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे." 25 ती स्त्री त्यास म्हणाली, "मी जाणते की, मसीहा ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार आहे, हे मला माहित आहे. तो येईल तेव्हा तो सर्व गोष्टी सांगेल." 26 येशू तिला म्हणाला, "तुझ्याशी बोलणारा मीच तो आहे."
Publicidade