27 नष्ट होणार्या अन्नासाठी श्रम करू नका, पण सार्वकालिक जीवनाकरता, टिकणार्या अन्नासाठी श्रम करा. मनुष्याचा पुत्र ते तुम्हास देईल, कारण त्याच्यावर देवपित्याने शिक्का मारला आहे." 28 तेव्हा ते त्यास म्हणाले, "आम्ही देवाची कामे करावीत म्हणून काय करावे?" 29 येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, "देवाचे काम हेच आहे की, ज्याला त्याने पाठवले आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा."
Publicidade