32 तेव्हा येशू त्यांना म्हणाला, "मी तुम्हास खरे खरे सांगतो, मोशेने तुम्हास स्वर्गातील भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हास देतो. 33 कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय." 34 तेव्हा ते त्यास म्हणाले, "प्रभूजी, ही भाकर आम्हास नित्य द्या."
35 तेव्हा येशू त्यांना म्हणाला, "मीच जीवनाची भाकर आहे. माझ्याकडे जो येतो त्यास कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्यास कधीही तहान लागणार नाही.